तुम्ही पण ‘दिल तो बच्चा है जी’ म्हणायला तयार राहा

 

‘दिल तो बच्चा है जी’... शीर्षक वाचून तुम्हाला वाटलं असेल की गाणं गुणगुणतोय काय आम्ही तर नाही, या नावाचे हलके-फुलके मराठी नाटक लवकरच रंगभूमीवर अवतरतंय. आजकालच्या धकाधकीच्या जगात थोडंसं मनोरंजन मिळालं तर दिवसातील अथवा आठवड्यातील काही क्षण आपण निश्चिंतपणे जगू शकतो. म्हणूनच आपले मराठी कलाकार प्रेक्षकांचे वेगवेगळ्या पध्दतीने मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात. असाच त्यांचा आगामी मनोरंजनाचा प्रयत्न म्हणजे ‘दिल तो बच्चा है जी’.

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘दिल तो बच्चा है जी’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होणार आहे. अशोक दगडू शिगवण सादर करीत असलेल्या या नाटकाची निर्मिती तृप्ती प्रॉडक्शन यांनी केली आहे आणि या नाटकाचं लेखन अक्षय जोशी यांनी केलं आहे. पॅडी कांबळे, प्रसाद खांडेकर, सुशिल इनामदार, ओम पनवेलकर, रसिका वेंगुर्लेकर, अंतरा पाटील आणि अदिती भास्कर यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका आहेत.

११ ऑगस्टला बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे येथे ‘दिल तो बच्चा है जी’ या नाटकाचा शुभारंभ प्रयोग रंगणार आहे.