‘हृदयांतर’ च्या नित्या आणि नायशानी सेलिब्रेट केला ‘फादर्स डे’

 

विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. ह्या ट्रेलरमधून चित्रपटातली सुबोध भावे यांनी साकारलेली मुख्य व्यक्तिरेखा शेखर जोशी ह्यांच्याकडे कामाच्या व्यापामुळे आपल्या नित्या आणि नायशा ह्या दोन मुलींसाठी वेळच नसतो, हे समोर आलंय.

‘हृदयांतर’ सिनेमातून मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहणा-या आणि आपल्या करियरच्या मागे धावताना कामात व्यस्त असल्यामुळे आपल्या मुलांना व्यवस्थित वेळ न देऊ शकणा-या अनेक ‘शेखर जोशीं’ची ही कथा म्हणायला हवी.

ही भूमिका साकारणा-या अभिनेता सुबोध भावेशी ह्यासंदर्भात चर्चा केल्यावर त्यांनी सांगितले की, “काहीही म्हणा, पण ह्या चित्रपटाच्या निमित्ताने दोन गोड मुलींचा बाप बनण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. कोणीही पुन्हा पुन्हा त्यांच्या प्रेमात पडाव्यात अशा ह्या मुली आहेत. ह्या दोन्ही मुली जेवढ्या लाघवी आहेत, तेवढ्याच समंजसही आहेत. त्यामुळे ह्यांच्यासोबत काम करणं नक्कीच सुखावह होतं.”

‘फादर्स डे’ च्या निमित्ताने सुबोधने नुकतीच त्याच्या दोन्ही ऑन-स्क्रिन मुलींना ट्रीट दिली. त्यावेळीही दोन्ही मुलींची सुबोधशी असलेली बॉन्डिग दिसत होती.

यंगबेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि टोएब एन्टरटेन्मेट निर्मित ‘हृदयांतर’ चित्रपट ७ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, आणि सोनाली खरे यांच्या मुख्य भूमिका आहेत.