पार पडला ‘जिओ फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळा...

 

जिओ फिल्मफेअरचा ६२ वा पुरस्कार सोहळा शुक्रवारी २७ ऑक्टोबरला मुंबईत पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.

पुरस्कारांमधील सर्वोच्च असा ‘जीवनगौरव पुरस्कार’ महाराष्ट्राचे लाडके ‘मामा’ अशोक सराफ यांना देण्यात आला. या सोहळ्याला अभिनेत्री दीपिका पदूकोण, माधुरी दिक्षीत, आदिती राव हैदरी या तारकांनी देखील उपस्थिती लावली होती. 

‘नटसम्राट’मधून अभिनयाची वेगळी उंची गाठणारे अभिनेते नाना पाटेकर यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर आजपर्यंत अनेक पुरस्कारांवर नाव कोरलेल्या रिंकूची जादू कायम राहिली. रिंकू राजगूरू’ने ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा बहुमान मिळवला. 

अभिनेत्री सई ताम्हणकरला ‘फॅमिली कट्टा’ चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाला. समिक्षकांची पसंती लाभलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘नटसम्राट’ची निवड करण्यात आली. संगीत विभागातील पुरस्कारांवर ‘अजय-अतुल’ जोडीने नाव कोरले. 

सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘सैराट’ला तब्बल ११ पुरस्कार मिळाले. प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला ‘व्हेंटिलेटर’ या मराठी सिनेमाला ५ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. तर ‘नटसम्राट’ला ३ फिल्मफेअर्सवर समाधान मानावे लागले.

सर्वांनाच उत्कंठा लागून राहिलेल्या या पुरस्कार सोहळ्यात कोणी किती पुरस्कार पटकावले याचा एक आढावा ...

सर्वोत्कृष्ट चित्रपट : सैराट 

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : नागराज मंजुळे (सैराट)

सर्वोत्कृष्ट अभिनेता : नाना पाटेकर (नटसम्राट)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : रिंकू राजगूरू : (सैराट)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका : (पुरूष) : विक्रम गोखले (नटसम्राट)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका : (स्त्री) : सई ताम्हणकर (फॅमिली कट्टा)

सर्वोत्कृष्ट समिक्षक पसंती : चित्रपट : नटसम्राट 

सर्वोत्कृष्ट समिक्षक पसंती : अभिनेता : मंगेश देसाई (एक अलबेला)

सर्वोत्कृष्ट समिक्षक पसंती : अभिनेत्री : वंदना गुप्ते (फॅमिली कट्टा)

प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता : महेश कोठारे

जीवनगौरव पुरस्कार : अशोक सराफ

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन : अजय-अतुल (सैराट)

सर्वोत्कृष्ट गीत : अजय-अतुल सैराट (याड लागलं)

सर्वोत्कृष्ट पार्श्चगायन : स्त्री : चिन्मयी (सैराट झालं जी )

सर्वोत्कृष्ट पार्श्चगायन : पुरूष : अजय गोगावले : याड लागलं (सैराट )

सर्वोत्कृष्ट पदार्पण : दिग्दर्शक : राजेश मापूसकर (व्हेंटीलेटर)

सर्वोत्कृष्ट पदार्पण : अभिनेत्री : रिंकू राजगुरू (सैराट) 

सर्वोत्कृष्ट पदार्पण : अभिनेता : आकाश ठोसर (सैराट)

सर्वोत्कृष्ट संवाद : भारत मंजुळे-नागराज मंजुळे (सैराट) 

सर्वोत्कृष्ट कथानक : राजेश मापूसकर : (व्हेंटिलेटर)