‘लूज कंट्रोल' 12 जानेवारीला करणार धमाका

 


नव्या वर्षाची धमाकेदार सुरुवात करण्यासाठी 'लूज कंट्रोल' हा धमाल मजेदार सिनेमा सज्ज झालाय. नुकतंच या सिनेमाचं टीझर आणि पोस्टर रिलीज करण्यात आल्याने सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. पुढील वर्षी 12 जानेवारी 2018 ला हा रिलीज होणार आहे. ‘प्रेम झांगियानी’ प्रस्तुत आणि ‘अजय सिंग’ दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे.

अजित साटम, जिग्नेश पटेल, मिहीर भट, इनामदार रियाझ, साकीब शेख यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असलेल्या तीन मित्रांची ही कथा असून रोजच्या जगण्यातील कथानक यातून मांडण्यात आलं आहे.

या धमाल सिनेमात मधुरा नाईक, अक्षय म्हात्रे, मनमीत पेम, शशिकांतकेरकर, कुशल बद्रिके, शशांक शेंडे, भालचंद्र कदम, आरती सोळंकी, टिया अथर्व, बिनोद राय बनतावा, बंटी चोप्रा, नम्रता आवटे, प्राजक्ता हनमगर, नम्रता कदम, अजय पुरकर, रामा नादगौडा, दीपिका सोनवणे, अंजली अत्रे, पूजा केसकर,    अंजली धारू, विकास वाघमारे, उमेश जगताप, प्रवीण खांडवे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

अजय सिंग  यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची कथा आणि पटकथा त्यांनीच लिहिली आहे तर संवाद प्रियदर्शन जाधव यानी लिहिले आहेत. संगीत रोहित नागभीडे आणि मिहीर भट यांनी दिलंय. पार्श्वसंगीत  आशिष यांनी दिलंय. तर सिनेमाचं कास्टिंग रोहन मापुसकर यांनी केलंय.  सिनेमाचं संकलन उज्वल चंद्रा यांनी केलंय. सिनेमटोग्राफी मर्जी पगडीवाला यांनी केलीये. तर सिनेमाचे कार्यकारी निर्माता म्हणून त्रिलोक सिंग राजपूत यांनी जबाबदारी पार पाडली आहे.