‘What’s UP लग्न’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

 

‘व्हॅाट्सअप’ आणि ‘लग्न’ या दोन्ही गोष्टी म्हणजे आजच्या तरूणाईचा जिव्हाळ्याचा विषय. या दोनही बाबतीत आजची पिढी अतिशय जागरूक आणि संवेदनशील आहे. तरूणाईचा हाच दृष्टीकोन ‘What’s UP लग्न’ या आगामी चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे.

फिनक्राफ्ट मिडीया अॅण्ड एन्टरटेंन्मेंट प्रा. लि आणि व्हिडिओ पॅलेस प्रस्तुत या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. जाई जोशी यांनी WHAT’SUP लग्न या चित्रपटाची निर्मिती केली असून विश्वास जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

WOW! वैभव आणि प्रार्थनाची ही सुंदर जोडी पुन्हा एकदा एकत्र-

http://www.marathidhamaal.com/news/so-good-to-see-prarthana--vaibbhav-together-again

‘नटसम्राट’ चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शकीय इनिंगला नाना पाटेकर यांनी याप्रसंगी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे, विक्रम गोखले, वंदना गुप्ते, विद्याधर जोशी, ईला भाटे, वीणा जगताप आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.

‘What’s UP लग्न’ चित्रपटाची कथा विश्वास जोशी, अभिराम भडकमकर यांची असून पटकथा, संवाद विश्वास जोशी, मिताली जोशी, अश्विनी शेंडे यांचे आहेत. चित्रपटाची गीते क्षितीज पटवर्धन, अश्विनी शेंडे यांनी लिहिली आहेत. संगीत निलेश मोहरीर व ट्रॅाय आरिफ यांचं आहे. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांचं आहे. छायांकन श्रीराम सेतूरामन यांचं असणार आहे.

जिव्हाळ्याच्या गोष्टी नेहमीच सुखद अनुभव देतात. ‘What’s UP लग्न’ सुद्धा निश्चितच एक रंजक अनुभव देईल.