संजय जाधवच्या ‘येरे येरे पैसा’चा मुहूर्त राज ठाकरेंच्या हस्ते संपन्न

 

‘येरे येरे पैसा’ हा नवा कोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटाचा मुहूर्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच या चित्रपटातील कलाकारांची ओळख देखील आता पटली आहे.

संजय जाधव यांनी त्यांच्या चित्रपटाची बातमी जाहिर केल्यानंतर त्यांच्या चित्रपटात त्यांचे लाडकेच कलाकार असणार असा ठाम विश्वास प्रेक्षकांचा होता. पण यावेळी तसं झालेलं नाहीए.

‘येरे येरे पैसा’ या चित्रपटात तेजस्विनी पंडीत, सिध्दार्थ जाधव, संजय नार्वेकर, उमेश कामत, मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अमेय विनोद खोपकर यांच्या सहकार्याने ट्रान्स एफएक्स स्टुडियोज प्रायव्हेट लिमिटेड आणि पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘येरे येरे पैसा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी संजय जाधव यांनी पेलली असल्यामुळे प्रेक्षकांना काहीतरी भन्नाट अनुभवयाला मिळणार यात शंका नाही.

ओम प्रकाश भट, अमेय खोपकर आणि सुजय शंकरवार निर्मित ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच ५ जानेवारी २०१८ ला प्रदर्शित होणार आहे.