‘ये ना गं आई तू खेळायला’; ‘लपाछपी’चा टीझर ट्रेलर प्रदर्शित

 

“एक खेळ लपाछपीचा, तू पण ये ना खेळायला...

ये ना गं आई तू खेळायला...,  अशा रहस्मयमय गाण्याने सुरु होणा-या ‘लपाछपी’ सिनेमाचा टिझर ट्रेलर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे. ‘जो घाबरला तो आऊट’ असे म्हणणा-या ‘लपाछपी’ सिनेमाचा टीझर प्रेक्षकांना काही सेंकदात थक्क करतो, आणि पुढे नेमके काय येणार याविषयी विचार करायला भाग पाडतो. माझ्यामते, यातच या सिनेमाचे पहिले यश आहे.

काही दिवसां अगोदर ग्लॅम अभिनेत्री पूजा सावंत प्रेग्नंट असल्याची बातमी वा-यासारखी पसरली, आणि पूजाच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला.  आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, आगामी 'लपाछपी'या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यानचा तिचा हा नवा लुक असल्याचे समोर आले.

या सिनेमाच्या टीझर ट्रेलरमध्ये पूजा सावंतने साकारलेली भूमिका आणि भूमिकेनुसार तिची बिथरलेली अवस्था सिनेमाच्या टीझरसोबत ब-यापैकी बांधून ठेवते. पूजाच्या एक्सप्रेशन्सवरुन काही केल्या नजर हलत नाही.

मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील आणि वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट आणि सुर्यवीरसिंग भुल्लर निर्मित आणि  विशाल फुरिया लिखित आणि दिग्दर्शित 'लपाछपी' सिनेमा  येत्या १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.