अमेयच्या ‘फास्टर फेणे’ मध्ये पर्ण पेठे आणि ‘हाफ तिकीट’ शुभम मोरे

 

अमेय वाघची प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘फास्टर फेणे’ त्याच्या पहिल्या झलकपासून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवतोय. आता यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे नुकतीच प्रदर्शित झालेली ‘फास्टर फेणे’ची एक नवी झलक.  

http://www.marathidhamaal.com/news/poster-of-faster-fene-is-also-wonderful

‘फास्टर फेणे’ च्या चित्रपटाचे नाव जाहिर झाल्यावर अनेकांना पुस्तकातला फाफे मोठ्या स्क्रिनवर पाहण्याची उत्सुकता होती (आणि अजूनही तितकीच किंवा त्याहून जास्त आहे), त्यानंतर या चित्रपटात फेणेची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचे लक्ष होते. पण जेव्हा अमेय वाघला फेणेच्या भूमिकेत पाहिल्यावर त्याच्यासोबत आणखी कोण कलाकार असणार हा प्रश्न अनेकांना सतावत असेल ना... तर आता ते देखील कळेल प्रेक्षकांना.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या झलक मध्ये आपण पाहू शकतो की अमेय वाघसोबत अभिनेत्री पर्ण पेठे आणि ‘हाफ तिकीट’ फेम बालकलाकार शुभम मोरे देखील या चित्रपटाचा हिस्सा आहेत.

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आणि क्षितीज पटवर्धन लिखित ‘फास्टर फेणे’ या चित्रपटाची निर्मिती जेनिलिआ देशमुख आणि मंगेश कुलकर्णी यांनी केली आहे.

झी स्टुडियोज आणि रितेश विलासराव देशमुख प्रस्तुत ‘फास्टर फेणे’ येत्या २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. टॉक्क!