‘ढोलकीच्या तालावर’च्या मंचावर रियानचे पप्पा म्हणजेच रितेश देशमुख

 

महाराष्ट्राचा लाडका आणि अष्टपैलू अभिनेता रितेश देशमुख याने कलर्स मराठीवरील ‘ढोलकीच्या तालावरच्या’ सेटवर हजेरी लावली. या मंच्यावर तो ‘बँकचोर’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आला होता. कलर्स मराठी आणि ढोलकीच्या तालावर तर्फे रितेश आणि जेनेलियाला एक खास भेट देण्यात आली. रितेशला फेटा आणि जेनेलियाला पैठणी हि भेट मिळाल्यानंतर तो भारावून गेला.

अप्सरांना अफलातून लावण्या करताना बघून रितेश आश्चर्यचकित होता त्याला किती कौतुक करावे समजत नव्हते. मागील आठवड्यात मानाचा फेटा पटकावलेल्या स्नेहल आणि तनयाने खोपट येथील ST stand वर ‘कसं काय पाटील’ या गाण्यावर लावणी सादर करून प्रेक्षकांची पसंती मिळवली. तसेच या आठवड्यात ईश्वरी आणि ऋतुजा यांनी मानाचा फेटा पटकावला आहे, आणि आता या दोघींना फ्लश मॉब करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

या भागामध्ये रितेश देशमुखने ढोलकीच्या तालावरील छोट्या अप्सरांसोबत बरीच धम्माल मस्ती केली. मंच्यावर या छोट्या मुलींना त्यांचा जितु मामा खाऊ देतो पण यावेळेस हि जबाबदारी रितेश देशमुखने पार पाडली, लहान मुली देखील रितेश कडून खाऊ मिळाल्यामुळे खूपच खुश झाल्या. अनुष्काने रितेश देशमुखला प्रेमाने रियानचे पप्पा अशी हाक मारली जे ऐकून रितेश म्हणाला रियानचे पप्पा असं मला फक्त जेनिलिया म्हणते पण आता तू देखील म्हणालीस हे ऐकल्यावर मंचावरील सगळ्याच मुली त्याला रियानचे पप्पा म्हणून हाक मारू लागल्या.

तसेच 2 mad ची स्पर्धक सोनल विचारे हिने रितेश देशमुखसाठी एक डान्स act सादर केला, ज्यामध्ये त्याच्या सुप्रसिध्द गाण्यांचा समावेश होता. तसेच हि मज्जा इथेच संपली नाही एका बाजूला लहान मुली, रितेश आणि जितु आणि दुसऱ्या बाजूला हेमंत ढोमे नी मोठ्या मुली यांच्या मध्ये रस्सी खेच स्पर्धा चांगलीच रंगली आणि ज्यामध्ये रितेशची टीम जिंकली.

ढोलकीच्या मंचावर प्रसिध्द असलेली ठेचा मोमेंट मध्ये रितेशने त्याची आठवण सांगितली, कि त्याला आई लातूरहून भाकरी आणि ठेचा पाठवते जो त्याला प्रचंड आवडतो. रितेश देशमुख, जितेंद्र जोशी, लहान मुली आणि हेमंत यांनी मंच्यावर बसून भाकरी आणि ठेचा मनसोक्त खाल्ला. ढोलकीच्या तालावरमधील मोठ्या मुलींनी रितेश दिश्मुख आणि जेनेलियाच्या प्रसिध्द अश्या ओरे पिया या गाण्यावर डान्स केला, जी त्याला खूप आवडला. तसेच समृद्धीने रितेशचा एक dialogue त्याच्या समोर बोलून दाखवला जे एकताच रितेश स्वत: मंच्यावर आला आणि त्याने तो dialogue पुन्हा तिच्याबरोबर म्हंटला. अश्याप्रकारे लहान मुलींनी आणि रितेश देशमुखने ढोलकीच्या मंच्यावर बरीच मज्जा मस्ती केली.

या आठवड्यामध्ये ढोलकीच्या तालावर वेस्टर्न पद्धतीच्या जुन्या लावण्या सादर केल्या जाणार आहेत तेंव्हा बघायला विसरू नका ढोलकीच्या तालावर १२ आणि १३ जूनला रात्री ९.३० वा. तुमच्या लाडक्या अभिनेत्या रितेश देशमुखसोबत फक्त कलर्स मराठीवर.