रोहन गुजर आणि स्नेहल देशमुखचा साखरपुडा!

 

रोहन गुजर याने झी मराठी वाहिनीवरील होणार सून मी ह्या घरची या मालिकेतील साकारलेली पिंट्याची भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात रेंगाळत असेल. पिंट्याच्या भूमिकेने प्रेक्षकांना एका भावाचे बहिणीवरील प्रेम, त्याचा तिला सपोर्ट या गोष्टी दाखवल्या. म्हणूनच या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलले होते. पण आता आमच्याकडे रोहनच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. 

नुकतेच रोहनने त्याची खास मैत्रिण स्नेहल देशमुखसोबत साखरपुडा केला आहे. आम्ही स्नेहलला रोहनची खास मैत्रिण म्हणालो कारण रोहनने त्याच्या साखरपुड्याचे फोटोस् सोशल मिडीयावर पोस्ट करुन त्याला ’१४ वर्षांची मैत्री’ असे कॅप्शन दिले. 

जेव्हा आपल्याला एखाद्या कलाकाराच्या लग्नाविषयी किंवा साखरपुड्याविषयी वाचायला, पाहायला, ऐकायला मिळते तेव्हा त्यांचा तो सुखी क्षणाचा सोहळा सोशल मिडीयावर ट्रेण्डिंग टॉपिक बनतो.  अशाचप्रकारे रोहनच्या साखरपुड्याची चर्चा पण सोशल मिडीयावर नक्कीच होत असणार. ही आनंदाची बातमी कदाचित त्याच्या फिमेल फॅन्ससाठी वाईट बातमी असू शकते. :p 

होणार सून मी ह्या घरची या मालिकेसह बन मस्का आणि येक नंबर या मालिकेत पण रोहनने प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन केले आहे. 

या सुंदर जोडीच्या साखरपुडाच्या सोहळ्यात त्यांच्या मित्र-मैत्रीणींची विशेष उपस्थिती होती. पाहा त्यांचे फोटो-