'शेंटिमेंटल’चे पहिले वहिले टीझर प्रदर्शित

 

मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अशोक सराफ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी समीर पाटील लिखित आणि दिग्दर्शित ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्या चित्रपटाच्या पोस्टरमधून अशोक सराफ यांनी साकारलेल्या पात्राची झलक पाहायला मिळाली.

नुकतेच ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटाचे पहिले वहिले टीझर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘पोश्टर बॉईज’ आणि ‘पोश्टर गर्ल’ या चित्रपटांतून सामाजिक विषयावर विनोदी ढंगाने भाष्य करणारे दिग्दर्शक समीर पाटील यांचा ‘शेंटीमेंटल’ निघालाय बिहारला. पहिल्यांदाचा मराठी सिनेमा निघालाय बिहारसाठी. पण बिहारच का असा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर नक्की पाहा ‘शेंटीमेंटल’ चा टिझर ट्रेलर-

आर. आर. पी. कॉर्पोरेशन आणि बनी डालमिया प्रस्तुत, इंजिनिअर्स कम्बाईंड मोशन पिक्चर्स एलएलपी निर्मित ‘शेंटिमेंटल’ मध्ये अशोक सराफ यांच्यासह विकास पाटील, पल्लवी पाटील, उपेंद्र लिमये, रघुवीर यादव, रमेश वाणी, माधव अभ्यंकर, उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोत्री, राजन भिसे, विद्याधर जोशी आणि सुयोग गोरे यांच्या भूमिका आहेत. समीर पाटील यांचा ‘शेंटिमेंटल’ २८ जुलैपासून मेंटल करायला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात सज्ज होणार आहे.