WOW! वैभव आणि प्रार्थनाची ही सुंदर जोडी पुन्हा एकदा एकत्र

 

‘कॉफी आणि बरंच काही’ आणि ‘मि.अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी ऑन स्क्रिन जोडी अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे पुन्हा एकदा नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

‘What’s Up Lagna’-

http://www.marathidhamaal.com/news/natsamrats-producer-vishwas-joshi-is-all-set-for-directorial-debut

नुकतेच प्रदर्शित झालेल्या ‘व्हॉट्स अप लग्न’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कलाकारांचे चेहरे दाखवण्यात आले नव्हते पण आता या चित्रपटातील जोडीचा खुलासा करण्यात आला आहे.

नटसम्राटचे निर्माते विश्वास जोशी ‘व्हॉट्स अप लग्न’ च्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. अ फिनक्राफ्ट मिडीया आणि व्हिडीयो पॅलेस प्रस्तुत आणि जाई जोशी निर्मित ‘व्हॉट्स अप लग्न’ मध्ये वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे प्रमुख भूमिकेत आहेत.

वैभव आणि प्रार्थनाच्या या चित्रपटातील भूमिका, त्यांची कथा लवकरच प्रेक्षकांना कळवले जाईल.