१०४ डिग्री तापात देखील तेजस्विनीने केले 'ये रे ये रे पैसा'चे शूट!

 

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने इन्स्टाग्रामवर वर नवरात्री स्पेशल जे फोटोशूट पोस्ट केलं आहे त्यातला एक फोटो नक्कीच लक्ष वेधून घेतोय. या फोटोत तिच्या हाताला सलाईनची सुई लावलेली दिसतेय. अनेकांना ही सुई कदाचित कॉस्ट्यूम्स आणि मेकअप चा एक भाग वाटेल, परंतु असं अजिबात नाहीये. तेजस्विनी पंडीतची तब्येत सध्या खालावली आहे आणि हे पाहायला मिळालं ‘ये रे ये रे पैसा’च्या सेट वर. सेटवरचा हा फोटो सध्या सर्वत्र पाहायला मिळतोय ज्यात तेजस्विनी अगदी चादर लपेटून बसलीये. 

तेजस्विनी सध्या संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. चित्रपटाचं शूटिंग बऱ्यापैकी पार पडलंय, त्यातलं तेजस्विनीचं चित्रीकरण सध्या सुरु आहे. परंतु त्याच दरम्यान तेजस्विनी खूप आजारी पडली, तिला १०४ डिग्री ताप होता आणि त्यामुळे तिला तात्काळ दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं होतं. परंतु केवळ दोन दिवस आराम करून तेजस्विनी पुन्हा एकदा ‘ये रे ये रे पैसा’च्या शूटिंगवर रुजू झाली. शूटिंगच्या दरम्यान तेजस्विनीची तब्येत तशी फारशी ठीक नाहीये. तरीदेखील तेजस्विनीने शूटिंग सुरु ठेवलंय. शूटिंगच्या ठिकाणी मध्ये ब्रेक घेऊन, औषधे घेणे, सलाईन लावणे असे उपचार करून ती तब्येत जपायचा प्रयत्न करतेय.

‘ये रे ये रे पैसा’च्या सेटवर तेजस्विनीची खास काळजी घेतली जातेय.