पहिल्या नजरेत प्रेमात पाडणारे ‘भेटली तू पुन्हा’चे प्रेमळ मोशन पोस्टर

 

“जगात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नाही... आपल्याला फक्त साईन सापडलं पाहिजे...”, असे सांगत ‘भेटली तू पुन्हा’ चित्रपटाच्या टीमने ऑफिशिअल पोस्टर प्रदर्शित केले होते आणि आता या चित्रपटाचे मोशल पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

ऍक्शन-ड्रामा-लव्ह स्टोरी असलेला  ‘दगडी चाळ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर चंद्रकांत कणसे एक नवीन हटके लव्हस्टोरी ‘भेटली तू पुन्हा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहेत.

“दूर तुझ्या असण्याने अस्वस्थ मी, आज तुला पुन्हा भेटून आश्वस्त मी”, अशा या सुंदर शब्दांच्या मदतीने या चित्रपटाचे सुंदर, गोड आणि प्रेमळ मोशन पोस्टर सोशल मिडीयावर नक्कीच अनेकांची पसंती मिळवेल यात शंका नाहीच. या मोशन पोस्टरमधील वैभव तत्त्ववादीचा स्मार्ट आणि पूजा सावंतचा गोड लूक सतत मोशन पोस्टर पाहायला भाग पाडेल.

स्वरुप रिक्रिएशन्स आणि मिडीया प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि गणेश रामदास हजारे निर्मित ‘भेटली तू पुन्हा’ २८ जुलै रोजी २०१७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.