‘नकुशी’ आणि ‘गोठ’मध्ये वटपौर्णिमेची पूजा

 

वटपौर्णिमा म्हणजे प्रत्येक सुवासिनीसाठी महत्त्वाचा सण. पतीसह असलेलं नातं सात जन्म रहावं, हे मागणं मागण्याचा हा दिवस. त्यातही लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा अगदीच स्पेशल असते.

स्टार प्रवाहवरील 'नकुशी' मालिकेतील नकुशी आणि 'गोठ' मालिकेतील राधा पहिल्यांदाच वटपौर्णिमेची पूजा करणार आहेत. मात्र, वटपौर्णिमेच्या मुहुर्तावर त्यांच्या आयुष्याची नवी नांदी होणार आहे. नकुशी आणि राधा यांच्या आयुष्यात काय बदल होणार हे जाणून घेण्यासाठी या दोन्ही मालिकांचा वटपौर्णिमा विशेष भागांची उत्सुकता आहे.


नकुशी या मालिकेत नकुशी आणि रणजित यांच्या नात्यात आता प्रेमाचा ओलावा निर्माण झाला आहे. नकुशीच्या आयुष्यात पूर्वी आलेल्या सौरभचं लग्न झालं आहे. तर, रणजितची पहिली बायको शेरनाझचं प्रकरणही संपलंआहे. त्यामुळे रणजित आणि नकुशी या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आहे. पहिल्यांदाच वटपौर्णिमेची पूजा केल्यानंतर नकुशीचं आयुष्य वेगळ्या वळणावर येऊन ठेपणार आहे. रणजित आणि नकुशीला एक गोड बातमी कळणार आहे. काय असेल ही बातमी, त्याचा रणजित आणि नकुशीच्या नात्यावर काय परिणाम होतो हे पाहणं रंजक ठरेल.तसंच, राधा आणि विलास यांचं नातं आता दिवसेंदिवस बहरत आहे. राधा आणि विलास यांच्या मधे आलेली नीला आता बाजूला झाली आहे. बयो आजीचा विरोध असतानाही विलास आणि राधा यांच्यातील मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आहे. त्यामुळे ही पहिली वटपौर्णिमा राधाच्या आयुष्याला बदलून टाकणार आहे. हा बदल 'विरा'साठी सकारात्मक आहे का, या बदलाला राधा कशी सामोरी जाते याची उत्सुकता आहे.पहिली वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या नकुशी आणि राधासाठी नक्की पहा वटपौर्णिमा विशेष भाग ८ जून रोजी नकुशी सायंकाळी ७ वाजता आणि गोठ रात्री ७:३० वाजता स्टार प्रवाहवर.