VIDEO: आपल्या कलाकारांचे रिअल लाईफमध्ये BFF कोण आहेत पाहा

 

मैत्रीला ना वयाचं बंधन असतं ना धर्माचं. मैत्री म्हणजे तरूणाईचं संपूर्ण विश्व असतं. मैत्रीचे बंध हे अतूट असतात.  जीवाला जीव देणा-या मित्रांसोबत जगण्याची मजाच काही औरच असते.

आपली मैत्री समजायला वेळ लागेल पण जेव्हा समजेल तेव्हा खरंच वेड लागेल, असं वाक्य अनेकजणांनी आपल्या प्रिय मित्र-मैत्रिणींकडून ब-याचदा भावनेच्या भरात ऐकलं असेल. मैत्री असतेच खास. मनात जपली जाणारी हळूवार भावना कधी मैत्रीच्या सुंदर नात्यात गुंफली जाते कळतंच नाही.

नुकताच आपण सर्वांनी फ्रेण्डशिप डे साजरा केला. या दिवशी अनेकांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा-भेटवस्तू दिल्या असतील. तसेच काहींनी त्यांच्या मित्र-मैत्रिणींना चित्रपट किंवा चित्रपटातील संवाद, गाणी डेडिकेट केली असतील.

चित्रपट ज्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्याशी रिलेट करतो तेव्हा नकळत आपल्या मनात कलाकारांविषयी विचार येतो. अर्थात त्यांच्या खासगी आयुष्यात त्यांचे खास मित्र कोण असतील. रिल लाईफ जगणा-या कलाकारांचे रिअल लाईफ मधील  खास मित्र-मैत्रिणी पाहायचे असतील तर हा व्हिडीयो नक्की पाहा-