VIDEO: थाटामाटात पार पडला ‘झी मराठी अॅवॉर्ड्स २०१७’ चा नामांकन सोहळा

 

महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्डस्. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो.

कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो. या मुख्य सोहळ्याइतकाच रंगतदार आणि देखणा असतो तो नामांकनाचा सोहळा. एका विशिष्ट संकल्पनेवर (थीमवर) हा आधारित असतो.

यावर्षी ‘ब्युटी अॅंड बिस्ट’ (Beauty and Beast) अशी थिम होती. अनेक कलाकारांनी त्या थीमला साजेसा पेहरावसुद्धा केला होता