‘वेलकम टू हंपी’, पाहा प्रियदर्शनच्या भूमिकेची झलक

 

सध्या आपल्या मराठी चित्रपटांत चित्रपटाचा आशय, कथानकाची मांडणी आणि नवीन लोकेशन्स या गोष्टींवर जास्त भर दिला जात आहे. एकाअर्थी आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत योग्य बदल होतोय ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आता एक आगळं वेगळं लोकेशन एका आगामी मराठी चित्रपटात दिसणार आहे. आणि तो चित्रपट आणि लोकेशन म्हणजे ‘हंपी’.

स्वरूप समर्थ एंटरटेन्मेन्ट आणि डिजीटल डिटॉक्स निर्मित आणि प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘हंपी’ चित्रपटाचा पहिला वहिला टिझर सोशल मिडीयावर नुकताच शेअर करण्यात आला आहे.

या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, अभिनेता प्रियदर्शन जाधव, ललित प्रभाकर अशी उत्तम स्टारकास्ट आहे आणि पहिल्या टिझरमध्ये प्रियदर्शन जाधवच्या भूमिकेची झलक आपण पाहू शकतो.

‘हंपी’ हा चित्रपट एका मुलीचा भावनिक प्रवास या आशयसूत्रावर बेतला आहे.  योगेश भालेराव आणि चैतन्य अकोलकर निर्मित हा चित्रपट ३ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.