ओळखा ‘भगवत गीता’मध्ये शशांकसोबत ‘ती’ कोण

 

झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ आणि झी युवा वरील ‘इथेच टाका तंबू’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेला चेहरा म्हणजे शशांक केतकर. शशांकने मालिकेसह नाटका आणि चित्रपटांच्या माध्यमांतून पण प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन केले आहे. ‘वन वे तिकीट’ या चित्रपटानंतर शशांकचे चाहते त्याला ‘भगवत गीता’ या आगामी चित्रपटात पाहू शकतात.

नुकतेच शशांकने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन ‘भगवत गीता’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला. शशांकचा आणखी एक चित्रपट हे पाहिल्यावर त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल. पण शशांकसोबत ती अभिनेत्री कोण ही जाणून घ्यायची पण इच्छा जास्त आहे. पण आता तुम्हीच ओळखा त्या विशिष्ट पोझवरुन तुम्हांला काय वाटतंय कोण असेल ‘ती’ शशांकची हिरोईन?

भारत जोशी निर्मित ‘भगवत गीता’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अंकुर काकटकर यांनी पेलली आहे. दिग्दर्शनासह त्यांनी या चित्रपटाचे लेखण देखील केले आहे. सध्या अंकुर यांचे ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ हे नाटक मराठी रंगभूमी गाजवत आहे. लवकरच अंकुर यांची ‘भगवत गीता’ प्रेक्षकांना अनुभवयाला मिळेल.