‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...

 

 

मागील तीन-साडे तीन वर्षात ‘चला हवा येऊ द्या’ हि फक्त एक मालिका नसून एक मोठा ब्रांड बनला आहे. एकही ब्रेक न घेता मालिकेने ३५० एपिसोड पुर्ण केले आहे. एखादा चित्रपट, मालिका, नाटक किव्हा कुठलीही कला सादर करण्यासाठी ती लोकांसमोर आणण्यासाठी हा एक उत्कृष्ट मंच ठरला आहे. भाषेची तमा न बाळगता बॉलीवूडचे अनेक सुपरस्टार सुद्धा ह्या मालिकेत सहभागी होतात.

हि मालिका आपल्या रोजच्या जिवनातले सगळे दु:ख विसरून आपणास हसायला शिकवते. हि मालिका जरी मराठी असली तरी चार चौकटीत न राहता ह्यांनी आपल्या मराठीचा झेंडा महाराष्ट्राबाहेर सुद्धा अभिमानाने फडकवला आहे आणि आता हि मालिका भारत दौऱ्यापुढे जाऊन विदेश दौरा करायला जात आहे. निलेश साबळे, भाऊ कदम, भरत गणेशपुरे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, सागर कारंडे ह्यांनी सादर केलेलं स्कीट हे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच हसायला भाग पाडते. आता मालिकेने थोड्या काळासाठी विश्रांती घेण्याचा विचार केला आहे. मालिकेतील सर्व पात्र सध्या विदेश दौरा करणार आहेत.

पुढल्या सोमवार पासून मालिकेच चित्रीकरण होणार नाहीये, पण घाबरू नका त्या ऐवजी तुमच मनोरंजन करण्यासाठी ‘सा रे ग म प’ सुरु होणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’चे होस्ट व डिरेक्टर निलेश साबळे ह्याने स्वतः हून ह्या बातमी दिली आहे. “थोड्या विश्रांती नंतर आम्ही परत येऊ” असे वचनहि निलेशने दिले आहे.