REVIEW: जगण्याचा संघर्ष दाखवणारा ‘बंदूक्या’

 


वेगवेगळ्या विषयांवर आधारित अनेक सिनेमे मराठीत येत आहे. मग तो सामाजिक असो वा कौटुंबिक. अशाच एका समाज पद्धतीवर आधारित बंदूक्या हा सिनेमा या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या हृदय हेलावणा-या रूढी, परंपरेवर आधारित हा सिनेमा भाष्य करत आहे. शिक्षणपद्धती मुळे समाजाच्या विचारसरणीत बदल झाला असला तरी काही समाज अजून जुन्याच रितीरिवाजात अडकलेला आहे. जुन्या अंधश्रद्धेत बुडालेला आहेबंदूक्या या सिनेमातून समाजातली एक पद्धत दाखवण्यात आली आहे ती म्हणजे कर्जफेडीसाठी बायको गहाण ठेवणे. जोपर्यंत कर्ज फिटत नाही, तोपर्यंत बाईने ज्याचं कर्ज त्याच्याकडे तेवढे दिवस राहायचं. केवळ राहायचं नाही, तर बायकोप्रमाणे राहायचं आणि कर्ज फिटलं की पुन्हा आपल्या लग्नाच्या नव-याकडे परत जायचं.

एकाच गावातील पालावर राहणाऱ्या आवल्या (नीलेश बोरसे) आणि तोलक (वासंतिका वाळके) हे दोघं एकमेकांना आवडायला लागतात. त्याच एकमेकांवर प्रेम असतं. मात्र त्यांच्या लग्नाला होकार देताना, मुलीचा बाप असलेला डोरल्या (शशांक शेंडे) आवल्याच्या आईकडे सुरंगीकडे (अतिषा नाईक) देज मागतो(देड म्हणजे लग्नात मुलांच्या बापाला मुलांकडून पैसे देण्याची पद्धत). लग्नात ठरल्याप्रमाणे देजाची अर्धी रक्कम सुरंगी डोरल्याला देते. मात्र उर्वरित रक्कम देण्यासाठी ती काही मुदत मागून घेतेपरंतु देजाची पूर्ण रक्कम देण्याआधीच तिचा मृत्यू होतोउरलेला देज मिळण्यासाठी डोरल्या जातपंचायत भरवतोत्या जातपंचायतीत पंच डोरल्याला सांगतात की आताच्या आता पैसे भर नाहीतर, बायकोला गहाण ठेव. आवल्या डोरल्याला आणि पंचांना समजावण्याचा खूप प्रयत्न करतो. मी कसही करुन देज फेडीन, असंही सांगतो. मात्र ते त्याचं काही ऐकत नाहीत. तेव्हा पालावरच वाढलेला बंदुक्या (नामदेव मुरकुटे) देजाची पाच हजार रक्कम रोख डोरल्याच्या हातात ठेवतो आणि तोलकला आपल्या बरोबर घेऊन जातो. खरंतर हा सारा प्रकार बंदुक्यानेच घडवून आणलेला असतो. कारण त्याचा तोलकवर जीव असतो..पुढे आवल्या देजाची रक्कम फेडतो का, तोलकला सोडवतो का, हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. मात्र त्यांच्या उत्तरासाठी सिनेमा नक्की जाऊन पाहा.

जसं सोनार-कुंभाराच्या मुलाने सराईतपणे दागिने नि मडकी घडवावीत, तशीच आपल्या मुलांनी चोरी करावी असं या समाजातील लोकांना वाटत असतं. त्यामुळे चोऱ्या माऱ्या करणा-या मध्ये बंदुक्या हा सरस दाखवला आहे. अनेकदा असे सिनेमे वातावरणनिर्मिती, भाषा, संवाद यामध्ये फसण्याची शक्यता असते. परंतु 'बंदुक्या' तसा फसत नाही‌विशेषतः यातल्या कलाकारांची कामं, बंदुक्याची भूमिका साकारणारा नामदेव मुरकुटे बंदुक्या कडक सादर करतो. त्याच्या समोर नायक-नायिकेच्या भूमिकेत असणारे नीलेश बोरसे आणि वासंतिका वाळकेही आपल्या भूमिका चोख बजावतात. मात्र डोरल्याची भूमिका साकारणारे शशांक शेंडे आणि सुरंगी साकारणाऱ्या अतिषा नाईक यांची विशेष दखल घ्यायला हवी. शशांक शेंडे अंतर्बाह्य डोरल्याच वाटतात, तर अतिषा नाईक खमकी सुरंगीच!सिनेमाचं लेखन, संवाद फार उत्तम पद्धतीत मांडण्यात आलं आहे म्हणून सिनेमाला तितकं वजन आलय म्हणायला हरकत नाही.

सिनेमातील 'माझा ईर' हे प्रमोशनल सॉंग आणि 'आता सोसना' हे इमोशनल सॉंग ही दोन्ही गाणी सिनेमाची कथा नेमकी उलगडण्यात मदत करत आहे. सिनेमात बंदूक्याची भूमिका ज्याने साकारली आहे त्याने माझा ईर हे गाणं लिहलेलं आहे.  आदर्श शिंदे याच्या भारदस्त आवाजातील हे गाणं प्रेक्षकांना थिरकायलं लावायला नक्कीच भाग पाडेल. सिनेमाचं कथासार उलगडणारं 'आता सोसना' हे गाणं गीतकार गुरु ठाकूर यांच्या लेखणीतून उतरलं आहे.  गायक जावेद अली आणि गायिका महालक्ष्मी अय्यर यांच्या सुमधूर आवाजाने या गाण्याला स्वरसाज चढला आहेकथेची व बोलीभाषेची पोत ओळखून संगीतकार परीक्षित भातखंडे यांनी  सिनेमाचं संगीत चोख पद्धतीने जमवून आणलं आहे. 

बंदूक्या या सिनेमाची कथा सत्यघटनेवर आधारित असल्याने प्रेक्षकांच्या काळजाला चटका लावून जाईल एवढं नक्की.