Review: वडिल - मुलाच्या संघर्षाची कथा – विठ्ठला शप्पथ

 


सध्या मराठीत नवनवीन प्रयोग होत आहेत. प्रेक्षकांचा ही सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाची महती आजवर अनेक मराठी सिनेमातून दाखवण्यात आली आहे. असाच एक सिनेमा या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी यांनी ‘विठ्ठला शप्पथ’ या मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने विठ्ठल भेटीचा ध्यास व आस याची अनुभूती प्रेक्षकांना घेता येणार आहे.

ही कथा आहे एका साध्या गरीब वडिल आणि मुलाची. मुलाचे आई-वडिल हे विठ्ठलभक्तित आपले आयुष्य जगत असतात, तर मुलगा कृष्णा गावातील सरपंचाच्या मुलाबरोबर गावक-यावर अन्याय करत फिरत असतो. कृष्णाच्या वडिलांना विठ्ठल मंदिर बांधायचं असतं. सरपंच मंदिराची जमीन हडपतो. सरपंचाच्या मुलाबरोबर लोकांवर अन्याय करता असताना कृष्णा एक खुणाच्या आरोपाखाली अडकून तुरूंगात जातो. बरं त्यानंतर कृष्णा तुरूंगातून सुटतो की नाही? विठ्ठल मंदिर बनतं की नाही? या प्रश्नांसाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.

सिनेमात हिरोईन दाखवलेल्या नैनाचे वडिल हे सिनेमातले व्हिलन दाखवले असतात. ज्यावेळी त्यांना कृष्णा आणि नैना बद्दल समजतं त्यावेळी ते कृष्णा समोर दोन ऑप्शन देतात, विठ्ठल मंदिर की नैना. सिनेमा हा काही वेळानंतर कंटाळवाणा होतो. हिरो कुठेतरी अडकतो तर हिरोईन लगेचच सगळं सावरायला येताना दाखवली आहे. शेवटी विठ्ठल मंदिर बांधण्यासाठी उभ्या राहिलेल्या हिरोला हिरोईन मिळेल का, विठ्ठल मंदिर बांधून होईल का किंवा शेवटी काय झाले, या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षच सिनेमा पाहायला हवा.

सिनेमात वेगवेगळ्या जॉनरची चार गीते यात असून राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी, आदर्श शिंदे, प्रवीण कुँवर या गायकांच्या आवाजात ती स्वरबद्ध करण्यात आली आहेत. मंगेश कागणे, क्षितीज पटवर्धन यांनी लिहलेल्या गीतांना चिनार-महेश या मराठी सिनेसृष्टीत सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोडीने संगीत व पार्श्वसंगीत दिलेलं आहे.   

मंगेश देसाई, अनुराधा राज्याध्यक्ष, उदय सबनीस, विद्याधर जोशी, संजय खापरे, अंशुमन विचारे, विजय निकम, केतन पवार, प्रणव रावराणे, राजेश भोसले या कलाकारांसोबत विजय साईराज, कृतिका गायकवाड ही नवोदित जोडी या सिनेमात पाहायला मिळत आहे.