गर्ल्स हॉस्टेल

 

प्रदर्शनाची तारीख: 10-7-2017

दिग्दर्शक : अमोल बिडकर

निर्माता : सोमिल क्रिएशन

कथा : शेखर ढवळीकर

पटकथा : चिन्मय मांडलेकर

संवांद : कुमुद इतराज

कथानक : झी युवा ही वाहिनी, नवोदित तरुण कलाकारांच्या अभिनय गुणांना नेहमीच वाव देते. या मालिकेत सुद्धा सर्वच नवोदित कलाकारांना संधी दिली आहे. या कलाकारांचं छोट्या पडद्यावरचं पदार्पण असलं तरी विविध नाटकांमधील भूमिकांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी यातली प्रत्येक व्यक्तिरेखा सशक्तपणे साकारली आहे. या मालिकेची कथा प्रसिद्ध लेखक शेखर ढवळीकर आणि पटकथा अभिनेता लेखक चिन्मय मांडलेकर यांची आहे तर संवाद कुमुद इतराज यांचे आहेत. सोमिल क्रिएशनची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केलं आहे.